पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2024 मराठी | PM Vishwakarma Yojana
PM Vishwakarma yojana 2024
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM Vishwakarma yojana 2024) मोफत प्रशिक्षण दिले जाईल, प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये दिले जातील. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आधुनिक उपकरण खरेदी (टूल किट) करण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातील. तसेच हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अर्जदार लाभार्थ्यांना 1 लाखापर्यंत कर्ज दिलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाढीव 2 लाखापर्यंत सवलतीच कर्ज देण्यात येईल. या कर्जावरील व्याजदर हा 5 % असेल, कर्ज परतफेड केल्यानंतर कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येईल.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय करायचा आहे परंतु त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत समाजातून मिळत नाही अशा लोकांसाठी समाजात या योजनेची निर्मिती करण्यात आली असून तेथे राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा तसेच त्यांनी त्यांचे जीवन आनंदाने जगावे आणि त्यांनी आपल्या देशाचे सक्षम नागरिक बनावे या हेतूने या योजनेची निर्मिती केली आहे.
आज आपण या लेखामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे पीएम विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती
- पंतप्रधान विश्वकर्मा योजना काय आहे ?
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा अर्ज कसा भरायचा
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे अधिकृत वेबसाईट
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता आणि अटी
PM Vishwakarma Yojana Kya hai
पंतप्रधान विश्वकर्मा योजना काय आहे ?
पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma yojana 2024) सरकारने देशातील गरीब आणि सामान्य लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केली आहे समाजातील कोणतीही व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल राहू नये आणि देशातील सर्वसामान्यांना आर्थिक सबळता मिळावी यासाठी सरकार अनेक योजना आणते त्याचप्रमाणे सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेची निवड केली आहे. ही केंद्रीय क्षेत्रामधील योजना आहे जी मंत्रालयाने सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांना वाढवण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केली आहे.
भारत सरकारने या योजनेअंतर्गत (PM Vishwakarma yojana 2024)18 व्यवसायांचा समावेश केला आहे या योजनेअंतर्गत सर्व कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते तो आपल्या कामात निष्णात असला पाहिजे एवढेच नाही तर या कौशल्य प्रशिक्षणानंतर त्याला कारण तो आपल्या कामात निष्णात असला पाहिजे एवढेच नाही तर या कौशल्य प्रशिक्षणानंतर त्याला कौशल्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही मिळते त्याला अधिकाधिक आधुनिक उपकरणे आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल पद्धती वापरण्यास तो प्रोत्साहित व्हायला हवा
PM Vishwakarma Yojana last date
या वर्षांमध्ये शेवटची तारीख 31 मार्च 2024 देण्यात आली आहे.ही योजना (PM Vishwakarma yojana 2024) चालवण्यासाठी सरकारने 13000 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. या मुळे स्वतःच्या हाताने कलेचा अविष्कार करणाऱ्या कारागिरांना आणि पारंपारिक साधनांनी काम करणाऱ्या कारागिरांना जास्तीत जास्त आर्थिक संधी मिळणार आहेत. या योजनेमुळे लघुउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मोठी मदत झाली आहे
सरकारने 2023 ते 2028 या पुढील पाच वर्षात पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma yojana 2024) राबविण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेत कारागिरांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार असून विश्वकर्मा समाजातील 140 जातीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसायातील कारागिरांना 18 व्यवसायामध्ये एक मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणा दरम्यान त्यांना दररोज पाचशे रुपये मानधन दिले जाणार आहे एवढेच नाही तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना व्यवसायाची अवजारे खरेदी करण्यासाठी 15000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. जर कोणाला या योजनेअंतर्गत अर्ज सादर करायचा असेल तर पीएम विश्वकर्मा पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल ही या प्रक्रियेची सुरुवात असेल.
पंतप्रधान विश्वकर्मा श्रम कौशल्य सन्मान योजनेची उद्दिष्टे
- पारंपारिक उपकरणांवर काम करणाऱ्या कारागिरांनी आधुनिक उपकरणांवर आधुनिक उपकरणांवर शक्य तितके जास्तीत जास्त काम करावे.
- सामान्य कारागिराला डिजिटल पेमेंट चे ज्ञान असले पाहिजे आणि त्याची डिजिटल पेमेंट करण्याची क्षमता वाढली पाहिजे.
- या देशात राहणारे कारागीर आणि त्यांची कौशल्य क्षमता वाढवणे.
- या सामान्य कारागिरांचा देशाच्या प्रगतीमध्ये सहभाग व्हावा.
- या देशातील प्रत्येक कारागीर आणि शिल्पकार आर्थिक दृष्ट्या सक्षम असायला हवा.
पंतप्रधान विश्वकर्मा श्रम कौशल्य सन्मान योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत (PM Vishwakarma yojana 2024) लाभार्थी कारागिरांना रोजगार सुरू करण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
- पंतप्रधान विश्वकर्मा योजना कौशल्य प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाते.
- सात दिवस मोफत प्रशिक्षण दिले जाते निवड झालेल्या कारागिरांना दररोज 500 रुपये मानधन दिले जाते.
- 18 प्रकारच्या व्यवसायांपैकी एका व्यवसायाचे एक आठवड्याचे मोफत कौशल्य प्रशिक्षण.
- या योजनेअंतर्गत आधुनिक अवजारे खरेदी करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला लाभार्थीला 15000 रुपयेदिले जातात.
- प्रत्येक डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल व्यवहारासाठी ₹1 रुपया लाभार्थीच्या बँक खात्यात महिन्यामध्ये 10 व्यवहारापर्यंत जमा केले जातात.
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3,00,000/- रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये दिली जाते पहिल्या टप्प्यामध्ये 1,00,000/- रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,00,000/-दिली जाते त्याचा व्याजदर पाच टक्के असतो आणि हे कर्ज 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार ?
- सुतार
- न्हावी
- मेस्त्री
- कुलुपांचे कारागीर
- सोनार
- कुंभार
- लोहार
- मूर्तिकार
- मोची
- टेलर
- धोबी
- मच्छीमार
- हार बनवणारे
- हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
- चटई, झाडू बनविणारे कारागीर
- लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
- बोट किंवा नाव बनवणारे शिल्पकार इ. कारागीरांसाठी आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता व अटी
- अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
- या योजनेंतर्गत सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय पात्र असणार नाहीत.
- बँकेचे खाते आधार कार्डशी जोडलेले असावे .
- अर्जदार योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर यांना लाभ.
- एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्यालाच लाभ.
- या योजनेंतर्गत सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय पात्र असणार नाहीत.
- बँकेचे खाते आधार कार्डशी जोडलेले असावे .
- अर्जदार योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
PM Vishwakarma Yojana online apply 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेचा अधिकृत pmvishwakarma.gov.in वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईटच्या होम पेजवर रजिस्टर ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्या वरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर आधार पडताळणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्या पृष्ठावर आधार कार्ड वरील माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर अर्ज करण्याचे पृष्ठ उघडेल.
- यानंतर तुम्हाला तुमचा वर्ग आणि इतर माहिती बरोबर लिहावी लागेल.
- सर्व माहिती व्यवस्थित लिहिल्यानंतर योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर करावी लागतील.
- यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
- तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
PM Vishwakarma Yojana 2024 Official Website
पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे.या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच इतर स्कीम बद्दल माहिती मिळवू शकता तुम्हाला योजनेबद्दल बद्दल जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे देखील या वेबसाईट वरती मिळून जातील.
टीप : तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर आढळली तरच तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाईल.यासाठी अर्जदाराने व्यवस्थित कागदपत्रांची पुर्तता करावी व लाभास पात्र व्हावे.